‘ऐतिहासिक’ विजयानंतर बीसीसीआयकडून टीम इंडियाला घसघशीत इनाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ऑस्ट्रेलियाच्या भूमिवर त्यांना कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा भीम पराक्रम हिंदुस्थानच्या विराट सेनेने करून दाखवला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित पराभवाचा पाणी पाजल्यानंतर विराट सेनेवर बीसीसीआयने बक्षिसांचा वर्षाव केला आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियातील खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी बीसीसीआयने इनाम जाहीर केले आहे.

कसोटी क्रमवारीत पुजारा-पंतची हनुमान उडी, 46 वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबाबत खेळाडूंचे आणि संघ सदस्यांचे अभिनंदन केले आहे. यासह अंतिम 11 मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मॅच फी इतकी म्हणजे 15 लाखांची रक्कम बोनस म्हणून मिळणार आहे. याचा अर्थ ज्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले त्यांना 60 लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे.

मुख्य खेळाडूंसह बीसीसीआयने राखीव खेळाडूंना मॅच फीच्या निम्म्या म्हणजे साडे सात लाखांची रक्कम बोनस म्हणून जाहीर केली आहे. तसेच प्रशिक्षकांना प्रत्येकी 25 लाखांचा एकरकमी बोनसही जाहीर केला आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात अॅडलेड कसोटीमध्ये विजय मिळवून केली. यानंतर पर्थ कसोटीत टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला. मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने यजमानांचा पराभव करत मालिकेत आघाडी मिळवली. सिडनी कसोटीत विजय मिळवून मालिका 3-1 अशी जिंकण्याच्या आशेवर पावसाने पाणी फिरवले, तरीही 71 वर्षात पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका विजय मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.