भाजपच्या नगरसेवकाकडून महिलेचा दुसऱ्यांदा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वडवणी

वडवणी नगरपंचायतचे भाजपचे नगरसेवक प्रेमदास सिताराम राठोड यांनी एका 24 वर्षीय महिलेचा दुसऱ्यांदा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून राठोड यांच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड हे वडवणी नगरपंचायतचे प्रभाग क्रमांक 17 चे भाजपचे नगरसेवक आहेत. साळींबा रस्त्याला लागून राहणाऱ्या एका महिलेवर त्यांची वाईट नजर होती. राठोड यांनी रात्री 2 ते 3 च्या सुमारास महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. महिलेने दरवाजा उघडताच राठोड यांनी तू मला खुप आवडतेस असे सांगत तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत राठोड यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून गु.र.नं.235/018,कलम 354,452 भादवी प्रमाणे आरोपी नगरसेवक प्रेमदास राठोड विरूध्द छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठोड फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, राठोड यांनी याच महिलेचा काही महिन्यापूर्वीही विनयभंग केला होता.त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी राठोड यांना भररस्त्यावर चांगला चोप देऊन त्याची इंडिका गाडी फोडली होती.