क्वारंटाईन नागरिकांसाठी आता शाळांचे दरवाजे उघडणार

495

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाल्या, परीक्षा लांबल्या, 15 दिवसांपासून शाळा ओस पडल्या या ओस पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत ते विद्यार्थ्यासाठी नाही तर परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी.

कोरोनामुळे काम बंद झाले हजारो कामगार गावाकडे परत येत आहेत. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करू पाहत आहेत अशा लोकांना गावात जाऊ न देता त्यांना बंद असलेल्या शाळांमध्ये आश्रय दिला जाणार आहे. गावापासून दूर असणाऱ्या शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी क्वारंटाईन नागरिक सोशल डिस्टन्स पाळून राहतील. त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था, हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्थाही केली जाणार आहे. या विलगीकरणं कक्षात इतर व्यक्तींना मज्जाव असेल, आरोग्य खाते नियमित त्यांची तपासणी सुद्धा करणार आहे, असे आदेश बीडचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी काढले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या