बीडमध्ये शिवसेना मदतीला धावली, गरीबांसह कर्तव्य बाजावणाऱ्यांना भोजन

857

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जात आहे. अशावेळी लॉकडाऊन परिस्थितीमुळे बीड शहरातील हातावर पोट भरणार्‍या लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी तसेच कोरोनाविरुद्ध लढाईत अग्रेसर असणारे आरोग्य सेवक व पोलीस प्रशासनातील ड्युटीवर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी 29 मार्च पासून मोफत भोजन व पाणी वाटप करण्याचा तत्पर सेवा भोजन प्रकल्प सुरू केला आहे.

या प्रकल्पाचा प्रारंभ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, पोलीस उपअधिक्षक भास्कर सावंत, उद्योजक शेषेराव खांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात झाला. हा प्रकल्प 14 एप्रिलपर्यंत सुरूच राहणार आहे. भयावह परिस्थितीत अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडलेले नागरिक, हातावर पोट असलेले समाज बांधव, आरोग्य सेवक आणि पोलीस प्रशासनातील कर्मचारी आणि निराधार यांना मोफत खिचडी व पाणी वाटप केले जाणार आहे. हा सेवा प्रकल्प दि. 29 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत सुरू राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या