शिवसैनिकांच्या एकजुटीने बीड विधानसभेवर भगवा फडकवू – सूर्यकांत शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी एक जुटीने कामाला लागावे, असे आवाहन विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात बीड विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांची उपस्थिती होती. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना विधानसभा संपर्कप्रमुख शिंदे यांनी बीड विधानसभेवर एकजुटीने प्रयत्न करत भगवा फडकवा असे सांगितले.

विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी बीड विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या ध्येयधोरणानुसार शिवसैनिकांनी काम करावे असे आदेश दिले. बीड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकद आता वाढली असून एकजुटीने विधानसभेवर भगवा फडकवावा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना सांगितले. यावेळी संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्यासह जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हाप्रमुख कुंडलिक बापु खांडे,, कामगार सेना नगर जिल्हाप्रमुख मुजीब भाई, किसान सेना समन्वयक बप्पासाहेब घुगे, जिल्हा संघटक गोरख सिंघन, भरत जाधव, उपजिल्हाप्रमुख भारत जगताप, आशिष मस्के, बाळासाहेब अंबुरे, जिल्हा सहसंघटक रतन गुजर, मशरू पठाण, महिला आघाडी जिल्हा संघटीका संगीता चव्हाण, आदी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांची उपस्थिती होती.