दुधापेक्षा बीअर बरी; मस्त प्या, स्वस्थ राहा!

1002

दारू, बिअर पिणं वाईट असे पालक आपल्याला सांगत होते. आपणही आपल्या मुलांना तोच सल्ला देत दूध प्या, लठ्ठ व्हा असे सांगतो; पण दुधापेक्षा बिअरच बरी, मस्त प्या आणि स्वस्थ राहा असा अजब दावा ‘पेटा’ या संस्थेने दिला आहे. ‘पेटा’च्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून सगळीकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. ‘हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’मधील एका अहवालात ‘पेटा’ने आपले बीअर प्रेम मांडले आहे.

बीअर प्यायल्याने होणाऱया फायद्यांची जंत्री देतानाच ‘पेटा’ने दुधामुळे काय नुकसान होते याची यादीच समोर ठेवली आहे. बीअरमुळे हाडे मजबूत होतातच, पण त्यामुळे आयुष्यही वाढते असे ‘पेटा’ने म्हटले आहे.

बीअर का प्यावी?
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी माणूस बरेच प्रयत्न करतो. व्यायाम करतो, दूध पितो, पण त्यामुळे काहीही परिणाम होत नाही. उलट बीअर का प्यावी हे ‘पेटा’ने सांगितले आहे. बीअर प्यायल्याने माणसाच्या शरीरातील मांसपेशी मजबूत होऊन आरोग्य ठणठणीत राहाते, असे ‘पेटा’चे म्हणणे आहे. याचे कारण देताना ‘पेटा’ म्हणते, बीअरमध्ये 90 टक्के पाणी असले तरी त्यासोबतच फायबर, कॅल्शियम आणि लोह हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आवश्यक घटकही असतात. बीअर प्यायल्याने हाडे मजबूत होतात. उलट रोज दूध प्यायल्याने माणसाला हृदयरोग होतो, लठ्ठपणा जडतो आणि कर्करोग होतो असेही ‘पेटा’ने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या