
बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींना जामीन दिल्यानंतर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने गोध्राकांडातील एका दोषीलाही जामीन मंजूर केला. त्याने रेल्वेवर दगड फेकला, त्यासाठी तो 17 वर्षांपासून कारागृहात आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळाला पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा रेल्वे स्थानकावर ‘साबरमती एक्प्रेस’ची एक बोगी पेटवून देण्यात आली हाती. यात 59 कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

























































