
‘गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकट प्रसंगातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. यास्तव शासनाला संपूर्ण सहकार्य करावे’ असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
गुढी पाडव्याचा मंगल सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा असं राज्यपालांनी जारी केलेल्या एका संदेशात म्हटले आहे. घरी रहा आणि सुरक्षित रहा ! असा संदेश देत असतानाच नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा शुभेच्छा राज्यपालांनी राज्यातील जनतेला दिल्या आहे. युगादि, चेती चाँद तसेच संवर पाडवो निमित्ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


























































