भरत लोहार चालले लंडन टेनिस बॉल क्रिकेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलतर्फे लंडनमध्ये आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईतून हिंदुस्थानतर्फे भरत लोहार या टेनिस क्रिकेटपटूची निवड झाल्याबद्दल के. आर. पी. स्पोर्टस् क्लबच्या वतीने त्यांचा गौरव करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याप्रसंगी सुधांशू स्पोर्टस्चे सुधांशू (पपी) परब, जयसिंग (बाळा) साटम, टेनिस क्रिकेटपटू भरत लोहार, के.आर.पी. स्पोर्टस् क्लबचे सेक्रेटरी संदीप विचारे व स्तंभलेखक श्रीकृष्ण हरचांदे यांची उपस्थिती होती. टेनिस क्रिकेटपटू भरत लोहार यांनी मुंबई व परदेशात अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्तम फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवला आहे.