भारत सासणे यांना ‘विंदा करंदीकर’ जीवनगौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव 2021 पुरस्कार ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी 2021 सालच्या वाङ्मय पुरस्कारांची बुधवारी घोषणा केली. श्री. पु. भागवत पुरस्कार (2021) लोकवाङ्मयगृह, मुंबई या संस्थेला, डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. कविवर्य मंगेश पाडगावकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना तर डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद (पुणे), कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) मराठी भाषा अभ्यास केंद्र (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार

प्रौढ वाङ्मय साहित्यात हेमंत दिवटे, राजू देसले, जयंत पवार, भीमराव वाघचौरे, अविनाश उषा वसंत, माधव जाधव, रुस्तम होनाळे, अरुण खोपकर, डॅनिएल फ्रान्सिस मस्करणीस, सॅबी परेरा, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. शाहू रसाळ, गंगाधर पाटील, उत्तम कांबळे, शशिकांत गिरिधर पित्रे, औदुंबर सरवदे, डॉ. बाळ फोंडके, अनंत केदारे, डॉ. शोभा पाटकर, डॉ. राणी बंग व करुणा गोखले, डॉ. मृदुला बेळे, राम जगताप, भाग्यश्री भागवत, मिलिंद चंपानेरकर, धनंजय जोशी यांना पुरस्कार जाहिर झाले आहे.

बालवाङ्मय पुरस्कार

कविता – एकनाथ आव्हाड, नाटक व एकांकिका – शशिकांत पाताडे, कादंबरी – डॉ. श्रीकांत पाटील, कथा – वसीमबार्री मणेर, सर्वसामान्य ज्ञान – किशोर माणकापुरे, संकीर्ण – डॉ. वैशाली देशमुख, सरपह्जीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार – गजानन देसाई.