पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा, भारतीय कामगार सेनेकडून 200 कुटुंबीयांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेतला असून अनेक ठिकाणी मदतयज्ञ सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेतर्फे सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील 200 कुटुंबीयांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वस्तूंमध्ये कपडे, गृहोपयोगी वस्तू आणि अन्नधान्याचा समावेश आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर जिह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे अनेकांना फटका बसला. या अतिवृष्टीत असंख्य घराची पडझड झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले. या आपद्ग्रस्तांना भारतीय कामगार सेनेच्या ग्रॅण्ड हयात युनिटतर्फे भारतीय कामगार सेना चिटणीस मनोज धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस सचिन अहिर यांच्या संकल्पनेतून ही मदत पाटणमधील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली. यासाठी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी मनोज धुमाळ, प्रशांत नाईक, अभय प्रभू, सिद्धेश पंढरकामे, संदेश परब, कुश गवस, संजय जाधव आदी उपस्थित होते.

या काळात आपग्रस्त नागरिकांना सहाय्य करणे, दसरा- दिवाळीत दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना दिवाळीचे फराळ, कपडे वाटप करणे, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम हॉटेल ग्रॅण्ड हयात युनिटतर्फे दरवर्षी राबवले जातात. याच सामाजिक उपक्रमाखाली कोरोनाविरोधातील राज्य शासनाच्या लढाईस मदत करण्यासाठी हॉटेल ग्रॅण्ड हयात युनिटतर्फे चिटणीस मनोज धुमाळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांची मदत अलीकडेच करण्यात आली आहे.