अकोला रेल्वे स्थानकात मिंधे गटाच्या खासदार भावना गवळींच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेल्या खासदार भावना गवळी यांना ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘गद्दार-गद्दार’ अशा घोषणांचा सामना करावा लागला. शिवसैनिकांच्या तुफान घोषणाबाजीमुळे कडाक्याच्या थंडीतही अकोला रेल्वे स्थानकावरील वातावरण मात्र तापले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत विदर्भ एक्प्रेसने मुंबईकडे निघण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर पोहचले. त्याचवेळी मिंधे गटाच्या भावना गवळीही गाडी पकडण्यासाठी तेथे आल्या. यावेळी विनायक राऊत यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांनी ‘गद्दार-गद्दार’ ‘50 खोके एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ अशी घोषणाबाजी करत खासदार गवळी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. यामुळे अकोला रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. या गोंधळात निमूटपणे खाली मान घालून गवळी रेल्वेगाडीत बसल्या.