मंडणगड – भिंगळोलीत वणवा भडकला; आगीने फळबाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
भिंगळोली समर्थ नगरात भर दुपारी वणवा भडकल्याने लागलेल्या आगीच्या विळख्यात काही निवासी घरे सापडली धुराच्या लोटाने समोरील दिसेनासे झाले होते. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते.  या वणव्याच्या आगीत  काही शेतक-यांच्या फळबागा लागवडी होरपळल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. मात्र नुकसानीचा आकडा हा पंचनाम्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आगीची माहीती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य नितिन म्हामुणकर यांनी आपल्यापरिने शर्थीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणताना ते खाली कोसळले मात्र आपल्या दुखापतीची तमा न करता त्यांनी शेवटपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले म्हणून पुढील अनर्थ टळला अन्यथा मोठेच नुकसान झाले असते.
मंडणगड शहराला लागूनच असलेल्या भिंगळोली या गावातील समर्थ नगरात गुरूवारी भर दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आगीचा वणवा भडकला. सुके गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे या ठिकाणी राहणा-यांची चांगलीच पंचायत झाली  होती. मात्र सुके गवत पेटून गेल्यावर आग आटोक्यात आली त्यामुळे सर्वांनीच  सुटकेचा निःश्वास टाकला.
मंडणगड हे तालूक्याचे ठिकाण असले तरी तालूक्यातील बहुतेक महत्वाची जसे तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, ग्रामीण रूग्णालय, ग्राम न्यायालय आदीप्रकारची  विविध प्रशासकीय  कार्यालये ही भिंगळोली गावातच आहेत. त्यामुळे भिंगळोली गाव हद्दीत विकासकांचे लक्ष गेले असून या गावात ठिक ठिकाणी विकासकांकडून  चार चार मजल्याच्या निवासी इमारती बांधण्याची चढाओढ सुरू आहे.  त्यामुळे जिकडे तिकडे निवासी इमारतींची उभी राहीलेली संकूले  आपल्याला पाहावयास मिळत आहेत.
  मंडणगड या तालूका ठिकाणाला लागूनच भिंगळोली असेल बाजूचे धुत्रोली गाव असेल या ठिकाणी आता झपाटयाने विस्तारीकरण होत असून मंडणगड भिंगळोली वा धुत्रोली गावांची ऐकमेकांची हद्द समजणे तसे मुष्किल झाले आहे असे शहरीकरण होत आहे त्यामुळे येथे काही आगींसारख्या आपत्तीच्या घटना घडल्या तर येथे त्यासाठी  किमान मिनी तरी अग्निशमन यंत्रनेची आवश्यकता आहे. कारण बाजूच्या दापोली येथून अग्नीशमन यंत्रणा मागवायची झाली तर ती नादुरूस्त आहे. त्यामुळे आता खेड तालूक्याशिवाय मंडणगडला पर्यायच नाही. खेड येथील अंतर पाहता आगीसारख्या घटना या मालमत्ता पूर्णपणे बेचिराख केल्यानंतर येथे वराती मागून घडे या उक्तीनुसार तेथे उपाय योजनांच्या यंत्रणा पोहचतील त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वेळीच जागे होवून प्रशासनाने येथे अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वित करून होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनीसुध्दा आपली महत्वाची भुमिका बजावणे हे महत्वाचे आहे.