Bhool Bhulaiyaa 2 ‘भूल भुलैय्या-2’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दीडशे कोटींकडे वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘भूल भुलैय्या-2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दोन आठवड्यानंतरही या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये चांगली गर्दी होत असून या चित्रपटाने शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांनी गर्दी केल्याने अनेक ठिकाणीचे शो हाऊसफुल्ल झाले. शनिवारी ‘भूल भुलैय्या-2’ या चित्रपटाने 11.35 कोटी रुपयांची कमाई केली. तर प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी अर्थात रविवारी या चित्रपटाने 12.77 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. या चित्रपटाने आतापर्यंत 122.69 कोटी रुपये कमावले आहेत. 75 कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट लवकरच दीडशे कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे.

100 कोटींचा टप्पा ओलांडणारा पाचवा चित्रपट 

2022 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी चांगले जात आहे. आतापर्यंत पाच चित्रपटांनी 100 हून अधिक कोटींची कमाई केली आहे. यात ‘भूल भुलैया-2’ चित्रपटाचाही समावेश झाला आहे. तत्पूर्वी ‘गंगुबाई काठियावाडी’ (फेब्रुवारी), द कश्मीर फाइल्स (मार्च), RRR (मार्च) आणि KGF2 (एप्रिल) या चित्रपटांनी 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता.