भुईबावडा घाट बंद! गगनवाबडा प्रशासनाने माती टाकून रस्ता बंद केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आज सर्वत्र अक्षरश: थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी गगनबावडा प्रशासनाने आपल्या हद्दीत माती टाकून रस्ता पूर्णत: बंद केला आहे. त्यामुळे भुईबावडा खारेपाटण मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाखो लोक आज संक्रमित झाले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाला घाटमार्ग बंद करुन प्रत्यक्षात काय साध्य करायचे आहे, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. तसेच आजारी रुग्ण असेल तर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर व अन्यत्र ठिकाणी घेऊन जाण्यासाठी करुळ घाट मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यासाठी भुईबावडा दशक्रोशीतील लोकांना भुईबावडा घाट जवळचा आहे. करुळ घाटमार्गे जाण्यासाठी 40 कि. मी. अंतर पार करावे लागणार आहे.

गगनबावडा प्रशासनाने आपल्या हद्दी माती टाकून रस्ता बंद केल्याने भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांसह अनेक प्रवाशांना माघारी फिरावे लागले आहे. प्रशासनाने हद्दी बंद करण्याऐवजी ठिकठिकाणी पोलिस चेक नाके तैनात करण्यात यावेत, अशीही मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे.