
प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघ आज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. स्नेहा हिला सर्वात कमी मतं मिळाल्याने तिला घरातून बाहेर यावे लागले. दरम्यान स्नेहाची तब्येत सध्या ठिक नसल्याने तिने प्रसारमाध्यमांशी इतक्यात बोलणार नसल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram
स्नेहा वाघ ही पहिल्या दिवसापासून घरात आली होती. सुरुवातीला इंडिपेंडेंट खेळ दाखवणारी स्नेहा गेल्या काही आठवड्यांपासून टीम ए सोबत खेळत होती. स्नेहाचे घरात जय व दादूस यांच्यासोबत चांगले संबंध होते. या आठवड्यात स्नेहा सोबत सोनाली, गायत्री, मीरा, उत्कर्ष, दादूस नॉमिनेट झाले होते. मात्र स्नेहाला सर्वात कमी मतं मिळाल्याने ती घरातून बाहेर आली.
View this post on Instagram




























































