
बिहारमध्ये 28 ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 71 जागांवर मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानाची जय्यत तयारी केली आहे. या टप्प्यात विद्यमान आठ मंत्र्यांसह अनेक दिग्गजांचे राजकीय भविष्याचा फैसला होणार आहे.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी हा टप्पा पार पडणार आहे. कोरोना काळात होणाऱया या मतदानासाठी निवडणूक आयोगाने अगोदरच नियमावली जाहीर केली असून त्यादृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आयोगाने मतदानाची वेळ एक तासाने वाढवून दिली असून कोरोनाबाधितांना सायंकाळी पाच नंतर मतदान करता येणार आहे. त्याचबरोबर आयोगाने प्रत्येक केंद्राकर सॅनिटायझर, मास्व ठेवण्याचीही सूचनाही केली आहे.
मतदानाच्या या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा सोमकारी सायंकाळी पाच गाजता थंडावल्या. या टप्प्यात भाजप, राजद, लोजप, जदयुसह सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. बिहारमधील बेरोजगारी समोर ठेवून राजकीय पक्षांनी नोकरी देण्याच्या आश्वासनाची बरसातच केली.
राजदने 10 लाख तर भाजपने 19 लाख नोकऱया देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे. भाजपने कोरोनाच्या संकटकाळाचाही राजकारणासाठी वापर केला असुन सत्तेत आल्यास प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात राज्याचे शिक्षण मंत्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जयकुमार सिंह, रोजगार मंत्री विजयकुमार सिन्हा, खाणमंत्री बृजकिशोर बिंद, महसुल मंत्री रामनारायण मंडल, ग्रामविकास मंत्री शैलेशकुमार, कृषि मंत्री प्रेमकुमार, परिवहन मंत्री संतोषकुमार निराला यांच्यासह माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, विधानसभेचे माजी अध्यक्ष उदय नारायण चौधरी, लोजपचे राजेंद्र सिंह, रामेश्वर चौरसिया, भगवानसिंह कुशवाह, राजदचे विजय प्रकाश, भाजपच्या श्रेयसी सिंह यांचे राजकीय भविष्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.




























































