बिहारमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या सुपौल भागात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन मुलांसह पती-पत्नीने एकाच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये पती-पत्नीसह 2 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह एकाच रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. कुटुंबाचा कोळसा खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता, पण त्यात यश येत नव्हते. या कुटुंबात कुणीही जास्त शिकलेले नाही. फक्त मुलगाच शिक्षण घेत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.