कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा ‘बिपिन’साठी फुटबॉल मैदाने फुलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली अनेक वर्षे फुटबॉल शिबिरे आणि स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाला वाव देणाऱ्या बिपिन फुटबॉल अकादमीच्या वतीने 34 वे बिपिन फुटबॉल अकादमी मोफत शिबीर यंदा आयोजित करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हे शिबीर होऊ शकले नव्हते, मात्र आता पुन्हा एकदा मैदाने छोटय़ा फुटबॉलपटूंनी भरणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांची राऊंड रॉबिन लीग पद्धतीने खेळवली जाणारी स्पर्धाही होणार आहे. 16 वर्षांखालील मुला-मुलींसाठीचे हे शिबीर 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बिपिन फुटबॉलचे निमंत्रक सुरेंद्र करकेरा यांनी शिबिरांबाबत  माहिती दिली. या शिबिराचा उद्घाटन सोहळा 16 ऑक्टोबरला होत आहे. बोरिवली येथील एमसीएफ जॉगर्स मैदानावर हे उद्घाटन होईल.

या शिबिरांची सविस्तर माहिती केंद्रवार

बोरिवली ः शिबीर संचालक ः कमलेश शृंगी (9819472440), प्रशिक्षक ः फ्रान्सिस न्यून्स, स्थळ ः एमसीएफ जॉगर्स पार्क फुटबॉल ग्राऊंड. मदनपुरा ः संचालक ः नासीर अन्सारी (9892882966), प्रशिक्षक ः मोहम्मद युसूफ अन्सारी, स्थळ ः वायएमसीए ग्राऊंड, मुंबई सेंट्रल. कुलाबा ः संचालक ः सुधाकर राणे (7666963035), प्रशिक्षक ः सचिन नरसप्पा, स्थळ ः कुलाबा बॅकबे ग्राऊंड. अंधेरी ः संचालक ः सिद्धार्थ साबापट्टी (7738450431), प्रशिक्षक ः रणजित मटकर, स्थळ ः अंधेरीचा राजा ग्राऊंड, आझाद नगर. वसई–विरार ः संचालक ः रुडॉल्फ डिकुन्हा (7385482299), प्रशिक्षक ः मार्टिन असिसी, स्थळ ः सेंट झेव्हियर्स ग्राऊंड, सेंट मायकेल चर्चच्या समोर, माणिकपूर, वसई (प.). कल्याण ः संचालक ः थॉमस कॅटेलिनो (7400094248), प्रशिक्षक ः थॉमस नाडर, स्थळ ः मॅक्सी फुटबॉल ग्राऊंड. कुर्ला ः संचालक ः सलीम खान (9004810177), प्रशिक्षक ः आदिल अन्सारी, स्थळ ः काका बाप्तिस्ता ग्राऊंड, कलिना, सांताक्रुझ. उल्हासनगर ः संचालक ः श्याम खरात (8080906262), प्रशिक्षक ः मोनप्पा मुल्या. स्थळ ः बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राऊंड.