
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने रविवारी संध्याकाळी निधन झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शोधात असलेल्या भाजपकडून 2 वाजता मुख्यमंत्री पदासाठीचे नाव घोषित करण्यात येईल आणि 3 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात येईल अशी खासगी वृत्तवाहिन्यांनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात संध्याकाळ झाली तरी पर्रीकर यांच्या जागी कोण हे निश्चित झाले नव्हते. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मगोपचा विरोध असल्याने अद्याप नावावर शिक्कामोर्तब झालेल नाही.
दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसने देखील गोव्याच्या राज्यपालांची भेट घेऊन आपले सत्तास्थापने संदर्भातील आपले पत्र सादर केले. तसेच आपल्याकडे बहुमताचा आकडा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी पक्षाचं काम बंद करावं, काँग्रेसची गोव्याच्या राज्यपालांवर टीका


























































