
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पदावर काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा कोणत्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मृदुला सिन्हा यांच्यावर टीका केली आहे.
‘राज्यपाल हे राज्याचे असतात. राज्यपालांनी कोणत्याही पक्षाचं काम करू नये. त्यामुळे जर राज्यपाल पक्षाचं काम करत असतील तर त्यांनी ते बंद करावं’, असा टोला गुलाम नबी आझाद यांनी मृदुला सिन्हा यांना लगावला आहे.
विधानसभा निवडणूकीत 16 जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसच्या आधी भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केल्यामुळे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजपला संधी दिली होती.


























































