
उत्तर प्रदेशमध्ये कायदा-सुव्यवस्था सांभाळता न आल्यामुळे आधीच विरोधकांच्या टीकेचे धनी बनलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कर्नाटक निवडणुकीतही फेल झाले. भाजपचे स्टार प्रचारक असा गाजावाजा करत मंडया जिह्यातील 8 मतदारसंघात त्यांनी प्रचार केला. पण एकाही मतदारसंघात त्यांना यश मिळवता आले नाही. मंडया जिह्यासह सगळीकडेच भाजपचा दारुण पराभव झाला.
कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव करून काँग्रेसने बहुमत मिळवले. भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा 56 जागा कमी मिळाल्या. कर्नाटक विधानसभा जिंकून दक्षिण हिंदुस्थानात पुन्हा भाजपला मुसंडी मारायची होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पेंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री कर्नाटकात प्रचारासाठी आले होते. मात्र, कर्नाटकमधील मतदारांनी काँग्रेसला निवडून भाजपला दक्षिण हिंदुस्थानात पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखले.
योगी केवळ नावापुरतेच राहिले
उत्तर प्रदेशमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना, माफियांचे पोलीस बंदोबस्तात खून केले जात असताना योगी आदित्यनाथ यांना मंडया जिह्यात प्रचारासाठी उतरले. मात्र, या जिह्यात आठ मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात भाजपला विजय मिळवता आला नाही. कर्नाटकी लोकांनी भाजपला इतर जिह्यातप्रमाणे या जिह्यातही आसमान दाखवले. त्यामुळे स्वतःला योगी समजून काम करणारे योगी उत्तर प्रदेशप्रमाणे कर्नाटकमध्येही केवळ नावापुरते योगी आहेत, हे सिद्ध झाले.

























































