भाजप नेते भिमराव जाधव यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाटोदा

पाटोदा येथील माजी आमदार कै. लक्ष्मणराव जाधव यांचे चिरंजीव तथा भाजप नेते भिमराव जाधव यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर उद्या मंगळवारी मांजरसुंबा रोडवरील शेतात सकाळी 9 वाजता अत्यसंस्कार होणार आहेत. भिमराव जाधव यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.