जिते गावात भाजपला धक्का; भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण तालुक्यातील जिते गावामध्ये भाजपला जोरदार धक्का बसला असून या गावातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड व विधानसभा संघटक बाळा म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

भाजपचे कार्यकर्ते लीलाधर म्हात्रे, गजानन म्हात्रे, योगेश म्हात्रे, दिपक ठाकूर, संदीप म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा हातात घेऊन भाजपला धक्का दिला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य नरेश गावंड, पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, शिवसेना विधानसभा संघटक बाळा म्हात्रे, जिते विभाग प्रमुख राजू पाटील, जिते शाखा प्रमुख भगवान म्हात्रे, रवी म्हात्रे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.