अंधांच्या ट्वेण्टी-20 विश्वचषकाला प्रारंभ

क्रिकेटचा सगळ्यात मोठा सामना 1939 साली खेळवण्यात आला होता. इंग्लंड आणि दक्षिणा आफ्रिकेतील हा सामना 14 दिवस सुरू होता

हिंदुस्थानात अंधांच्या तिसऱ्या ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून 17 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेचे आयोजन देशातील आठ राज्यांत सुरू असून महाराष्ट्रातील दोन सामने शनिवारी आणि रविवारी होणार आहेत. शनिवारी होणाऱ्या सामन्यात श्रीलंका व बांगलादेश संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. तर रविवारी बांगलादेशसमोर ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असेल. या सामन्यांचे आयोजन क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) यांनी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहेत. दोन्ही सामने कांदिवलीच्या एमसीएच्या मैदानावर होतील.