मालवणात श्री मक्रेश्वर प्रासादिक बाल मंडळाच्या वतीने रक्तदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीची गरज लक्षात घेता श्री मक्रेश्वर प्रासादिक बाल मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन मक्रेश्वर मालवण येथे सोमवारी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिवसेना तालुकाप्रमुख व जिल्हा परीषद सदस्य हरी खोबरेकर व नगरसेवक पंकज सादये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी संमेश परब, नरेश हुले, भाऊ मोरजे, उत्तम पराडकर, मंगेश पराडकर, दादा कोचरेकर, दाजी मोरजे, कैलास रेडकर, किरण जाधव, बाळा बांदकर, हरेश मोरजकर मरिना डीसोजा, प्रमिला मोरजे, प्रवीण मोरजकर उपस्थित होते.

रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पालव, हेमांगी रणदिवे, किशोर नांदगावकर, उल्हास राणे, नितीन गावकर, धाकू जाधव यांचे सहकार्य लाभले.