महिला क्रिकेटपटूंशीही बीसीसीआयचा करार; हरमन, स्मृती, दीप्ती ‘ए’ श्रेणीत कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी हिंदुस्थानच्या वरिष्ठ महिला खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. कर्णधार हरमनप्रीत काwरसह 3 खेळाडूंना ‘ए’ श्रेणीमध्ये कायम ठेवले आहे. मात्र यावेळी ‘ए’ श्रेणीमध्ये पाचऐवजी तीनच क्रिकेटपटू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोलंदाज पूनम यादवची ‘ए’ श्रेणीमधून ‘बी’ श्रेणीमध्ये घसरण झाली, तर राजेश्वरी गायकवाड स्वतःहून करारातून बाहेर पडली.

बीसीसीआयच्या ‘ए’ श्रेणीत हरमनप्रीतसह उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना कायम ठेवण्यात आले आहे. ‘ए’ श्रेणीतील महिला क्रिकेटपटूंना वार्षिक 50 लाख रुपये मिळतात. ‘बी’ श्रेणीतील खेळाडूंना 30 लाख, तर ‘सी’ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 10 लाख रुपये मिळतात. रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष आणि राजेश्वरी गायकवाड यांच्यासह 5 खेळाडूंचा ‘बी’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीत फक्त शेफाली कायम आहे. जेमिमा आणि रिचा यांना बढती मिळाली आहे.

‘सी’ श्रेणीतील 9 खेळाडू–  बीसीसीआयच्या वार्षिक करारातील ‘सी’ श्रेणीमध्ये मेघना सिंग, देविका वैद्य, सब्बिनेनी मेघना, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल व यास्तिका भाटिया या 9 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. पूजाची ‘बी’ श्रेणीतून ‘सी’ श्रेणीत घसरण झाली आहे. पूनम राऊतला ‘सी’ श्रेणीतूनही बाहेर करण्यात आले आहे.

पुरुष अन् महिला क्रिकेटपटूंच्या करारात मोठा फरक पुरुष अन् महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक करारात पैशाचा विचार करता मोठा फरक आहे. पुरुष क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणीच्या आधीची श्रेणी असलेल्या ‘ए’ श्रेणीतील खेळाडूंना एका वर्षासाठी 7 कोटी रुपये, ‘ए’ श्रेणीसाठी 5 कोटी, ‘बी’ श्रेणीसाठी 3 कोटी आणि ‘सी’ श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात, मात्र महिला क्रिकेटपटूंची सुरुवातच ही 50 लाखांपासून सुरू होते.