गियानामध्ये 119 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, 13 जणांना वाचवले; बचावकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण अमेरिकेतील गियाना देशात 116 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. एमव्ही बारिमा ही बोट राजधानी जॉर्जटाऊनहून उत्तर अटलांटिक किनाऱ्यावरील पोर्ट कैटुमाकडे जात होती. यादरम्यान पोमेरोन नदीजवळ बोट उलटली. बोटीतील 53 जणांना वाचवण्यात यश आले असून, अन्य बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 11.01 वाजता मदतीसाठीचा संदेश (कॉल) मिळाला. सरकारी आणि खाजगी बोटींच्या मदतीने तात्काळ शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री जुआन एजहिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. या अपघातात कुणाच्या मृत्यूची माहिती अद्याप मिळाली नाही. जुआन एजहिल यांच्या म्हणण्यानुसार, बोटीमध्ये 250 लाईफ जॅकेट्स, दोन रिजिड लाईफ राफ्ट्स आणि सहा इन्फ्लेटेबल लाईफ राफ्ट्स होते.