Video प्रियांका गांधींना पुरुष पोलिसांनी घेतले ताब्यात, नेटकऱ्यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्याविरोधात काँग्रेस खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करत थेट पंतप्रधान मोदींच्या घराला घेराव घातला. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले. यावेळी प्रियांका गांधींना ताब्यात घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात महिला पोलिसांच्या ऐवजी पुरुष पोलीस प्रियांका गांधी यांना पोलीस व्हॅनमध्ये ढकलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले असून त्यांनी पोलिसांवर व सरकारवर टीका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

प्रियांका गांधी यांना ताब्यात घेताना महिला पोलीस कुठे होत्या? त्यांना पुरुष पोलिसांनी का ताब्यात घेतले असे प्रश्न नेटकऱ्यांनी केले आहेत. दिल्ली पोलीस महिलांच्या बाबतीतही कायदे तोडत आहेत.

या आंदोलनात काँग्रेस खासदारांनी धर्मेंद्र प्रधानांसोबतच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या खासदारांची धरपकड करत त्यांना बळजबरीने उचलून व्हॅनमध्ये कोंबले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी पकडले. या दडपशाहीमुळे वातावरण कमालीचे चिघळले आहे. दरम्यान, तीन तासांनंतर रात्री राहुल गांधी यांची सुटका करण्यात आली.