अमेरिकेतून 18 हजार हिंदुस्थानी नागरिकांना परत पाठवणार; ट्रम्प प्रशासनाचा झटका, अपील करण्याचीही संधी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठय़ा प्रमाणात हद्दपारी मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे. ट्रम्प यांच्या मोहिमेत अमेरिकेत कागदपत्रांविना राहणारे सुमारे 18 हजार भारतीय नागरिक निशाण्यावर आले आहेत. त्यांना हद्दपार करुन हिंदुस्थानात पाठवण्यासाठी ट्रम्प प्रशासन लष्करी विमानांचा वापर करण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाचे म्हणजे या नागरिकांना कोणतेही अपील करण्याचीदेखील संधी मिळणार नाही.

ट्रम्प यांच्या ‘इमिग्रेशन कस्टम्स अॅण्ड एनपर्ह्समेंट’च्या (आयसीई) पथकांनी विविध शहरांमध्ये छापे टापून कागदपत्रांविना वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेऊन डिटेंशन सेंटरमध्ये डांबून ठेवण्यात येत आहे. न्यूयॉर्प, टेक्सास, पॅलिपहर्निया इत्यादी शहरांमध्ये ही सेंटर्स आहेत, मात्र या ठिकाणी डांबलेल्या लोकांसोबत गैरवर्तन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील संघीय व्यवस्थेमुळे प्रत्येक राज्यात मानवाधिकारांशी संबंधित वेगवेगळे कायदे आहेत, परंतु आयसीई कोणत्याही राज्यात जाऊन कारवाई करत आहे. नागरिकांना अपील करण्याचीही संधी दिली जात नाही.

पुन्हा बेड्या घालून पाठवणार?

गेल्या वर्षी अमेरिकेने सुमारे साडेतीन हजार हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करून हिंदुस्थानात पाठवले होते. अमृतसर येथे एका लष्करी विमानातून 104 हिंदुस्थानींना उतरवण्यात आले होते. त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या. यावरून बराच गदारोळ झाला होता. आतादेखील तसेच होणार का, असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे.