कियारा अडवाणी ठरली 2023 वर्षातील Google वर सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती

2023 मध्ये गुगलच्या टॉप सर्च लिस्टमध्ये बॉलिवूड स्टार्स, क्रिकेट खेळाडू, डिजिटल इनफ्ल्यूएंसर, ग्लोबल सेलिब्रिटी, अशा बऱ्याच लोकांची नावे आहेत. मात्र गुगलच्या मते, कियारा अडवाणी ही 2023 मधील हिंदुस्थानात सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती ठरली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी एमएस धोनी; द अनटायटेल्ड स्टोरी, शेरशाह तसेच सत्यप्रेम की कथा या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ती ओळखली जाते. अभिनयाबरोबरच फॅशनच्या बाबतीतही कियाराचा अव्वल नंबर आहे. सिद्धार्थ कियाराच्या लग्नानंतर तिच्या लोकप्रियतेत अधिक भर पडली. याच कारणामुळे या वर्षातील सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती कियारा अडवाणी ठरली आहे.

याचबरोबर दुसऱ्या स्थानावर क्रिकेट स्टार शुभमन गिल ठरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या संघात खेळणारा हिंदुस्थानी वंशाचा रचिन रवींद्रचा आहे. चौथ्या स्थानावर मोहम्मद शामी, तर पाचव्या स्थानावर बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादव आहे.