
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. भूमीने सांगितले की, तिला बरे वाटत असून तिच्यात कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळली आहेत. ती डॉक्टरांच्या संपर्कात असून सर्व खबरदारी घेत असल्याचं तिने सांगितलं आहे. यासोबतच आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं ती म्हटली आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट करत भूमीने लिहिलं आहे की, ‘माझ्यात कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळली आहेत. मी ठीक असून स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. मी डॉक्टरांच्या संपर्कात आहे. जे ही व्यक्ती माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी.’
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार यालाही कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याने स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं होत. मात्र आता तो रुग्णालयात दाखल झाला आहे. याबाबत सोशल मीडियातून माहिती देताना त्याने लिहिलं आहे की, ‘तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. याचा प्रभाव दिसत असून मी ठीक आहे. मात्र खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशा आहे मी लवकरच बरा होऊन घरी परतेल, स्वतःची काळजी घ्या.’



























































