
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता यांच्या नियुक्तीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात केली होती. कायदामंत्री किरण रिजीजू यांनी या नियुक्तीबाबत ट्विट केले आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश असेलेले न्यायमूर्ती दत्ता यांची 28 एप्रिल 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी होती, विमानसेवाही बंद होती. अशा स्थितीत न्यायमूर्ती दत्ता यांनी कोलकाता ते मुंबई असा रस्ते प्रवास करून मुंबई गाठली होती आणि मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली होती.

























































