
लहान मुलं कधी काय करतीय हे सांगता येत नाही. बऱ्याचदा ते अशी कृती करतात त्यांच्यावर रागावण्याऐवजी हसूनहसून पोट दुखू लागते. असाच एक प्रकार तुर्कीमध्ये घडला आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीतमध्येच घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान (Recep Tayyip Erdoğan) यांना महामार्गाच्या उद्घाटनाला बोलावण्यात आले होते. एर्दोगाना यांच्या हस्ते फीत कापून या महामार्गाचे लोकार्पण होणार होते. यासाठी सर्व तयारीही झाली होती. मात्र मंचावर उपस्थित असलेल्या एका चिमुरड्याने एर्दोगान यांच्या आधीच फीत कापली.
Video – कात्रीने जमलं नाही म्हणून दाताने कापली फीत, पाकिस्तानी मंत्र्यांचा कारनामा
फीत कापल्यानंतर मुलगा ती पकडून उभा होता. याच दरम्यान एर्दोगान यांचे लक्ष मुलावर जाते. मुलाने केलेला पराक्रम पाहून एर्दोगान हे त्याच्या डोक्यावर हळूच मारतात. ही घटना 4 सप्टेंबरला घडली असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रपदी आणि लहान मुलामधील हा क्षण खूपच मजेशीर होता, असे म्हटले.
A boy cut a ribbon during the opening ceremony for a highway tunnel in Turkey. That wasn’t such a big deal in itself, but that job had been reserved for Turkey’s president Tayyip Erdogan pic.twitter.com/dk0cNj3Yrp
— Reuters (@Reuters) September 5, 2021

























































