एमएमआरडीए-पोर्ट ट्रस्टच्या वादात वडाळा-जीपीओ मेट्रो प्रकल्प लांबला

38

सामना प्रतिनिधी, मुंबई

कोणी किती खर्च करायचा याबद्दल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यात मतभेद असल्याने वडाळा ते जीपीओ या मार्गावरील मेट्रो-4 प्रकल्प लांबला आहे. मेट्रो-4 प्रकल्प जमिनीवरून नेण्यापेक्षा भुयारी मार्गाचा असावा असा आग्रह पोर्ट ट्रस्टने धरला आहे.

चार किलोमीटर लांबीचा मेट्रो-4 प्रकल्प भुयारी मार्गाने न्यायचा असेल तर त्याचा खर्च पोर्ट ट्रस्टने करावा असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. हा प्रकल्प भुयारी केला तर त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला एक हजार कोटी रुपये खर्च येईल आणि पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरून एलिव्हेटेड केला तर त्यावर प्रति किलोमीटर 300 कोटी रुपये खर्च येईल अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

या प्रकल्पाचा खर्च कोणी करायचा आणि तो कोणत्या पद्धतीने राबवायचा याबद्दल चर्चेतून मार्ग काढला जात आहे असे पोर्ट ट्रस्टकडून सांगण्यात येते. मेट्रोसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीवर रिक्रिएशन सुविधा उभारण्याची पोर्ट ट्रस्टची योजना आहे. पोर्ट ट्रस्टकडे मेट्रो प्रकल्पासाठी देण्यास अतिरिक्त निधी नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोर्ट ट्रस्टकडे 390 एकर जागा असून त्यातील 75 टक्के जागा ही मोकळी मैदाने आणि रस्त्यांसाठी ठेवण्यात आली आहे.

summary- bpo and mmrda conflict delays wadala gpo metro project

आपली प्रतिक्रिया द्या