ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे तांडव, जुने सांगाडे उकरून नव्या मृतदेहांचे दफन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच असून अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा संसर्गाचा जोर वाढला आहे. युरोप, अमेरिका, दक्षिण अमेरिकेतही कोरोनाचा जोर वाढत असून बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या थैमानात मृत्यूचे तांडव सुरू आहे. कोरोनामुळे झालेल्या मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी कबरीतून जुने सांगाडे उकरून काढावे लागत आहेत. एका ठिकाणी जवळपास हजार सांगाडे बाहेर काढून मृतदेहांसाठी जागा तयार करण्यात आली. ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत 3 लाख 25 हजार जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. जगातील सर्वात घनदाट लोकसंख्या असलेल्या साओ पावलोमधील काशोइरिन्हा सिमेट्रीतील दृश्ये मन हेलावून टाकणारी आहेत.