चोरीला गेलेल्या एटीएमचा सांगाडा सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, धुळे

शहरातील मालेगाव रोडवरील केंद्रातून चोरीस गेलेल्या एटीएम मशीनचा सांगाडा मालेगाव पुढील मुंगसे शिवारात आढळला. मुंगसे शिवारात गॅस कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी मशीन फोडून त्यातील रोख रक्कम लांबविली आहे. पैसे हाती लागल्यानंतर चोरटे मुंबईच्या दिशेने पळून गेले असावेत, असा अंदाज तपास करणाऱ्या पथकाचा आहे.

दरम्यान, एटीएम केंद्रासमोरील हॉटेल गौरवच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात एटीएमची विल्हेवाट दोघांनी लावली असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रीकरण धुसर असल्याने संशयितांचा शोध घेणे अवघड झाले आहे, पण एटीएम केंद्रात आयसीआयसीआय बँकेने सीसीटीव्ही कॅमेरा का लावला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या हाती लागलेले चित्रिकरण धुसर असल्याने चोरटय़ांची ओळख पटणे तितकेच धुसर झाले आहे. असे असताना आयसीआयसीआय बँकेने एटीएम केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे का लावले नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो. पहाटे दोन ते सकाळी सात या कालखंडात मुंगशे शिवारातन कोणकोणत्या मोबाईल क्रमांकाने संभाषण केले आहे याची माहिती पोलीस घेत आहेत. त्यातील संशयित क्रमांक शोधून तो हाताळणाऱया चोरटय़ांना पोलीस जेरबंद करण्याची शक्यता आहे. बँकेकडे असलेल्या माहितीनुसार चोरटय़ांनी मशीनमधील 44 लाख 44 हजार 800 रुपये पळविले आहेत. याशिवाय तीन लाख रुपये किमतीच्या मशीनचे चोरटय़ांनी नुकसान केले आहे.

summary- broken atm found at dhule which got theft