बुलढाण्यात कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, जिल्ह्यातील पहिली घटना

5843

बुलढाणा जिल्हा रूग्णालयात शनिवारी भरती केल्यानंतर एका तासात एका रूग्णाचा मुत्यू झाला होता. त्या रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

त्या रुग्णाच्या स्वॉबचे नमुने ते नागपुरला तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी त्याचे रिपोर्ट्स आले असून दगावलेला रूग्ण हा कोराना बाधीत होता अशी माहीती जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद्र पंडीत यानी दिली आहे त्यामुळे या रूग्णाच्या संपर्कात किती लोक आले याचा तपास केला जात असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान या घटनेमुळे बुलढाण्यातील जनतेत घबराट पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या