लातूर शहरात दिवसाढवळ्या घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

शहर आणि जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून येथील राघवेंद्र कॉलनीत चोरट्यांनी दिवसाढवळ्या घर फोडले आहे. यावेळी भामट्यांनी सुमारे ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज पळवला आहे.

लातूर शहर आणि जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरासह ग्रामीण भागात घरे, दुकाने फोडली जात आहेत. सीसीटीव्ही मध्ये चोरीच्या घटना कैद होऊनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे शहरात रात्रीपेक्षा दिवसा घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. शहरात नुकतेच राघवेंद्र कॉलनी भागातील आशिष नामदेवराव चव्हाण यांचे घर फोडण्यात आले. घरातील महिला मुलांना शाळेतून आणण्यासाठी र गेल्या होत्या.याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कूलुप तोडले, कपाट फोडले आणि रोख ५० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा सुमारे ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.