
चोरट्यांनी घरात शिरून तब्बल पावणेसात लाख रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना 15 ते 16 नोव्हेंबरला फुरसुंगीतील पांडवदंड रस्ता परिसरातील इमारतीत घडली. याप्रकरणी संभाजी हरपळे (वय 59) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार संभाजी हरपळे फुरसुंगीतील पांडवदंड रस्ता परिसरात राहायला आहेत. 15 ते 16 नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून कपाटाचे लॉक तोडले. तब्बल 6 लाख 63 हजारांचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.































































