ब्रेकिंग : मोखाडा घाटात बस दरीत कोसळली; सहा जणांचा मृत्यू, 45 जखमी

429

सामना प्रतिनिधी । पालघर

शिर्डीवरून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या खासगी बसला नाशिक-जव्हार रोडवर भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोखाडा घाटात ब्रेक फेल झाल्याने बस 35 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. सर्व भाविक गुजरात येथील असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या