
चार राज्यांच्या चार विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेवर झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सर्वच जागांवर भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या दोन्ही ठिकाणी भाजपचा पराभव होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या हाती भोपळा येण्याचीच शक्यता आहे.
महाराष्ट्र
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. आजी-माजी पालकमंत्र्यांसह महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून बातमी लिहीपर्यंत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या 15 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे सत्यजित कदम हे पिछाडीवर आहेत.
पश्चिम बंगाल
आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना मैदानात उतरवले होते. ते सध्या आघाडीवर असून भाजपच्या अग्नमित्रा पॉल या पिछाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा 90 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय पक्का मानला जात आहे. गेल्या आठ वर्षांपासून ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपला गमवावा लागण्याची चिन्हे आहेत.
Kolhapur By-election – 18 व्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 13855 मतांची निर्णायक आघाडी
पश्चिम बंगालमधील बालिगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचे बाबुल सुप्रिय यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार थेट चौथ्या नंबरला फेकला गेला आहे. बातमी लिहीपर्यंत बाबूल सुप्रियो यांना 31624 मते, तर भाजपचे उमेदवार केया घोष यांना 4298 मते मिळाली होती.
रामाचे धनुष्यही आमच्याकडे आणि हनुमानाची गदाही! संजय राऊतांचे विरोधकांना सणसणीत उत्तर
बिहार
बिहारमधील बोचहां विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता दलाने भाजपला धक्का दिला आहे. राददचे उमेदवार अमर कुमार पासवान यांनी मोठी आघाडी घेतली आहे. अमर कुमार पासवान यांनी भाजपच्या बेबी कुमार यांच्यावर दुसऱ्या नंबरवर ढकलले असून तब्बल 22 हजारांची आघाडी घेतली आहे.
आम्ही हनुमान, रामाचे भक्त; फक्त प्रदर्शन करत नाही! – जयंत पाटील
छत्तीसगड
छत्तीसगडच्या खैरांगढ विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत देखील भाजप पिछाडीवर आहे. काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांनी 10 हजार मतांची आघाडी घेतली आहे. भाजपच्या कोमल जांघेल या पिछाडीवर असून यशोदा वर्मा यांनी घेतलेली आघाडी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.




























































