दिनदर्शिका प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव वर्षानिमित्त शिवसेना, युवा सेनेसह विविध सामाजिक संघटना, संस्थांकडून आकर्षक दिनदर्शिकांचे प्रकाशन केले जात आहे. सर्वसामान्यांना आपले वार्षिक नियोजन करण्याबरोबरच सण, समारंभ, मुहूर्त, राशीभविष्य पाहण्यासाठी या दिनदर्शिका उपयुक्त पडत आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, अदानी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, आमदार, विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अदानी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना नेते, खासदार, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सरचिटणीस मंगेश दळवी, कार्याध्यक्ष प्रदीप बोरकर, सहकार्याध्यक्ष कैलास चव्हाण, खजिनदार भारत दळवी, चिटणीस राजेंद्र लकेश्री, हेमंत लोखंडे, प्रशांत चव्हाण, प्रभाकर साईल उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दिनदर्शिका मराठी व इंग्रजीचे प्रकाशन वन्यजीव (पश्चिम) मुंबईचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते नॅशनल पार्क, बोरिवली येथे करण्यात आले. याप्रसंगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक मल्लिकार्जुन, सहाय्यक वनसंरक्षक संजय कांबळे, प्रियांका बर्गे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, सचिन रेपाल, उपसंचालक, दिनेश देसले, बारदे उपस्थित होते. या दिनदर्शिकेची संकल्पना संतोष कंक यांची असून यातील सर्व छायाचित्रे राजू बांदेकर व रणजीत जाधव यांची आहेत.