
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात शेतकऱ्यास धक्काबुक्की करुन त्याच्याजवळील १७,६३० रुपये जबरदस्तीने काढून घेतलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले.
१९/१०/२०१८ रोजी गुंजोटी येथील शेतकरी आसीफ मुनवर मुंसी हे शेतमाल विक्री करुन आलेले १७६०० रुपये पॅन्टच्या खिशात ठेऊन गावाकडे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आले. अचानक एकाने त्यांच्याजवळ येऊन त्यांचा हात पिरगाळला आणि खिशातील पैसे काढून घेतले. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हरंगुळ रेल्वे स्टेशनवर सद्दाम मुश्ताक फारुके रा.कुर्डवाडी जि.सोलापूर यास पाठलाग करुन पकडले. त्याने सदरील गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याच्याजवळून १० हजार रुपये पोलीसांनी जप्तही केले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, कर्मचारी राम गवारे, युसुफ शेख, संपत फड, राजाभाऊ मस्के, सचीन मुंढे यांनी यासाठी परिश्रम घेतले.































































