हैदराबाद एनकाऊंटर प्रकरणी बुधवारी होणार सुनावणी, पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

405

हैदराबाद मधील बलात्कारी आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बुधवारी या खटल्याची सुनावणी होणार आहे. एका वकीलाने हैदराबाद चकमकीवर सर्वोच्च न्यायलात याचिका दाखल केली आहे. ही याचिका अजून सुनावणीसाठी कोर्टात लिस्ट केली गेली नाही. परंतु त्यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी यासाठी वकीलांनी मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाए वकील जी एस मणी यांनी ही याचिका दाखल केली आहे. एन्काऊंटरचे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वानुसार साइबराबादचे पोलीस आयुक्त वीसी सज्जनार आणि चकमकीत सामील असणार्‍या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही याचिकेत केली आहे. या चकमकीत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले गेलेले नाही असा आरोपही वकील मणी यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या