वगसम्राट दादू इंदुरीकर यांची जन्मशताब्दी साजरी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाढवाचं लग्न या वगनाटय़ाद्वारे दादू इंदुरीकर यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या वगसम्राटाची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनाने साजरी करावी तसेच राज्याच्या सहा महसूल विभागांमध्ये त्यांच्या वगनाट्य आणि लोकनाट्य महोत्सवाचे आयोजन करावे, अशी मागणी मंगळवारी दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्राध्यापक प्रकाश खांडगे यांनी केली. दादू इंदुरीकर यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदुरी या गावी त्यांचे उचित स्मारक तसेच लोकसाहित्य लोककला तमाशा कलेचे अद्यावत ग्रंथदालन उभारावे, तमाशा कलावंतांसाठी रंगमंच असावा तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या शिल्पकार योजनेखाली दादू इंदुरीवर यांचे चरित्र प्रकाशित व्हावे अशी मागणीही त्यांनी केली. तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे निवासी आश्रम शाळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्याची मागणी उपाध्यक्ष गणेश चंदनशिवे यांनी केली.