
झंडू पंचारिष्ट, इमामी लिमिटेडच्या वतीने नुकताच जागतिक पाचन आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त एका विशिष्ट पाचन रोग किंवा विकारांबद्दल सार्वजनिक आणि वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न लोकांमध्ये जागरुकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या बारा महिन्यांच्या मोहिमेची सुरुवात केली जाते. याविषयी बोलताना इमामी लिमिटेडच्या आरोग्य सेवा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुल राज भाटिया म्हणाले, ‘लोक सहसा वारंवार होणारा गॅस, आम्लपित्त, अपचन यांसारख्या किरकोळ पचन समस्यांकडे दुर्लक्ष करतात, तात्पुरते उपाय शोधतात आणि सामान्यतः पचनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तथापि, तर पाचन तंत्र ही शरीरातील सर्वात महत्त्वाची प्रणाली आहे आणि पाचन तंत्र 70 टक्के प्रतिकारशक्ती बनवते. झंडू पंचारिष्टाने निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी पाचन आरोग्याचे महत्त्व लोकांना शिकवण्यासाठी एक अग्रगण्य पुढाकार घेतला आहे.
























































