माध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकार माध्यमांवर अंकूश ठेवत असून त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादली गेली आहे असा आरोप विरोधी पक्षाकडून साअत्याने होत असतो. तर हे आरोप खोटे असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त ते दिल्लीत बोलत होते.

जेटली म्हणाले की “सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत, त्यांच्यासोबत प्रिंट आणि डिजिटल माध्यमेही आहेत. तांत्रिकदृष्ट्या आपल्याकडे अनेक माध्यमे आहेत.” अशावेळी माध्यमांवर सेन्सॉरशिप लादणे शक्य नसून त्यांच्यावर दबावसुद्धा आणणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.