
केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा पेंद्र सरकारचा हेतू नेहमीच होता. दीर्घकाळापासून तशी मागणी आहे. पण आता राज्यांनी एकत्र येऊन त्याचे दर ठरवायचे आहेत, असे पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर सांगितले. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी कायद्यात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची तरतूद आधीच केली आहे. आता सर्व राज्यांनी एकत्र येऊन दर ठरवण्यासाठी चर्चा करायची आहे, असे त्या म्हणाल्या.
दिल्लीत पेट्रोलची मूलभूत किंमत 55.46 रुपये आहे. त्यावर 28 टक्के जीएसटी लावला तर कर 15. 58 रुपये होईल. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन शुल्क आणि डीलर कमिशन अनुक्रम 20 आणि 3.77 रुपये असेल. त्यानंतर पेट्रोलची एकूण किंमत 75.01 रुपये होईल.
























































