
कोरोना महामारीच्या संकटकाळात केंद्र सरकारने दोन कोटी बांधकाम कामगारांच्या खात्यात पाच हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असे केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले.
कामगार मंत्रालयाच्या वतीने आयोजित करोना योद्धा सत्कार समारंभात ते बोलत होते. त्यांनी मुख्य कामगार आयुक्त, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ या संस्थातील कर्मचाऱयांचे प्रश्न कोरोनाकाळातही सोडवल्याबाबत कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला.
दोन कोटी बांधकाम कामगारांच्या खात्यात पाच हजार कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 80 अधिकाऱयांना प्रतिनियुक्ती देण्यात आली होती.
इएसआयसी व इपीएफओ यांच्यासह प्रादेशिक कार्यालयांनी अहोरात्र काम करून कर्मचाऱयांच्या अडचणी सोडवल्या. 20 कक्षांकडे 16 हजार तक्रारी आल्या होत्या. त्यातील 96 टक्के वेळेत सोडवण्यात आल्या आहेत.


























































